Advertisement

यंदा ‘डिजिटल’ आंबेडकर जयंती साजरी करा, अजित पवारांचं आवाहन

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरीच आणि डिजिटलमाध्यमातून साजरी करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

यंदा ‘डिजिटल’ आंबेडकर जयंती साजरी करा, अजित पवारांचं आवाहन
SHARES

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरीच आणि डिजिटलमाध्यमातून साजरी करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. तसंच राज्यातील जनतेला आंबेडकर जयंतीच्या (Digital ambedkar jayanti) शुभेच्छाही दिल्या.

केलं अभिवादन

मंगळवार १४ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या विचारांनी, कार्याने महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुता यांसारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. 

हेही वाचा - सोनू सूद करणार ४५ हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था

सोशल मीडिया वापरा

देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण घरात थांबूनच त्यांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोना विरुद्धच्या लढाईतील एकजूट दाखवून देऊया.

कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

घरीच पुस्तके वाचा

तर, राज्यात कोरोना व्हायरसचं वाढतं संकट बघता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचं वाचन करुन १४ एप्रिल हा दिवस ‘वाचन दिन’ म्हणून घरातच साजरा करावा, असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केलं. 

बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढलं. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बौद्ध धम्माची दीक्षा दिली. महात्मा फुले यांचा जन्मदिन ज्ञानाचा दिवा लावून घरातच झाला साजरा. त्याप्रमाणे बाबासाहेबांची पुस्तके वाचून त्यांची जयंती घरीच साजरी करुया, असं भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - केंद्र सरकारच्या मोफत तांदळाचं वाटप सुरू- छगन भुजबळ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा