Advertisement

महाराष्ट्रात काँग्रेस डिसिजन मेकर नाही- राहुल गांधी

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गहिरं होत असताना या अपयशाचं खापर काँग्रेसवर फुटू नये म्हणून राहुल गांधी अंग काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही म्हटलं जात आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस डिसिजन मेकर नाही- राहुल गांधी
SHARES

महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस या तिन्ही पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार (maha vikas aghadi government) सत्तेत आहे. या तिन्ही पक्षाचे नेते आम्ही सर्व निर्णय एकमताने घेतो असं सांगत असले, तरी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी मात्र ही बाब तितकीशी मान्य नाही. कारण भलेही महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेस सहभागी असली, तरी काँग्रेस डिसिजन मेकर (congress not decision maker in maharashtra says mp rahul gandhi) नसल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे.

मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करताना काँग्रेसची हतबलता देखील व्यक्त केली. त्यांच्या विधानातून काँग्रेसच्या म्हणण्याला सरकारमध्ये महत्त्व दिलं जात नाही किंवा काँग्रेस सरकारमध्ये असूनही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाही, असा अर्थ निघत आहे. 

शिवाय महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गहिरं होत असताना या अपयशाचं खापर काँग्रेसवर फुटू नये म्हणून राहुल गांधी अंग काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही म्हटलं जात आहे.

हेही वाचा - राहुल गांधी अपयशाचं सगळं खापर शिवसेनेवर फोडताहेत- देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले राहुल गांधी? 

महाराष्ट्रातील कोरोनाची (coronavirus) स्थिती गंभीर आहे. ज्या ठिकाणी लोकं दाटीवाटीने राहतात तिथं कोरोना पसरण्याचा मोठा धोका असतो. महाराष्ट्रात देखील दाटीवाटीच्या वस्तीत, प्रामुख्याने मुंबईत कोरोना याच पद्धतीने हातपाय पसरत आहे. अशा स्थितीत काँग्रेस कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी सरकारला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. परंतु इथं काँग्रेस पक्ष डिसिजन मेकर म्हणजेच निर्णायक भूमिकेत नाही. त्यामुळे पक्षाला कामकाजाला बऱ्याच मर्यादा आहे. पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची ती स्थिती नाही. या राज्यांमध्ये काँग्रेस ठोस निर्णय घेऊ शकते. परंतु महाराष्ट्रात तसं नाही. महाराष्ट्र उद्योगधंद्यांच्या बाबतीत देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला शक्य तितकी मदत केली पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले होते.

यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं विधान अतिशय गंभीर असून ते स्वत:च्या जबाबदारीपासून पळ काढणार विधान आहे.  कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सापडलेला असताना काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून अपशयाचं संपूर्ण खापर मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचं त्यांच्या विधानावरून दिसून येतं, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा