Advertisement

राज्य सरकारचं पॅकेज बघून डोळे पांढरे होतील, हसन मुश्रीफ यांचा भाजपला टोला

महाविकास आघाडी सरकार बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी असं मोठं पॅकेज जाहीर करेल की, भाजपचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला.

राज्य सरकारचं पॅकेज बघून डोळे पांढरे होतील, हसन मुश्रीफ यांचा भाजपला टोला
SHARES

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही लाॅकडाऊनमुळे (lockdown) अडचणीत आलेल्या जनतेसाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भाजपकडून होत असताना महाराष्ट्र सरकार (maha vikas aghadi government) सर्वसामान्यांसाठी इतकं मोठं पॅकेज देईल की बघणाऱ्याचे डोळे पांढरे होतील, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. याचसोबत मुश्रीफ यांनी लवकरच राज्य सरकारकडूनही पॅकेजची (stimulus package for maharashtra) घोषणा होईल, असे संकेत दिले. 

हे तर कर्जच

केंद्राच्या पॅकेजसंदर्भात बोलताना मुश्रीफ (rural development minister hasan mushrif) म्हणाले की, केंद्राने २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. परंतु केंद्र सरकारने घोषित केलेलं हे पॅकेज म्हणजे एकप्रकारचं कर्जच आहे. ३ लाख कोटींचं कर्ज एमएसईबीला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. शेतकऱ्यांना बँका दारात उभ्या करत नाहीत, त्यांना कोणी कर्ज देत नाही. पेंडिंग आणि लेंडिंगमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे त्याचा कुठलाही फायदा होणार नाही. 

हेही वाचा - महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी

मुंबईला तुटपुंजा निधी

पीएम केअर फंडासाठी मुंबईतून सर्वाधिक निधी गेला. मात्र त्याबदल्यात मुंबईला अवघे ४०० कोटी आणि उत्तर प्रदेशला १५०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. हा दुजाभाव कशासाठी? असा प्रश्नही हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारकडे राज्य शासनाचे जीएसटीची थकबाकी म्हणून असलेले १२,५०० कोटी रुपये शिल्लक आहेत. ते देण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात येऊनही, केंद्र सरकार त्याकडे कानाडोळा करते, असंही मुश्रीफ म्हणाले.

डोळे पांढरे होतील

भाजपने महाराष्ट्रात ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलनही केलं. त्यांना हे सांगू इच्छितो की, महाविकास आघाडी सरकार बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी असं मोठं पॅकेज जाहीर करेल की, भाजपचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला.

हेही वाचा - मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या- संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा