Advertisement

कोरोना संकट: अखेर राज्यपालांनी सरकारसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरूवार २८ मे २०२० रोजी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.

कोरोना संकट: अखेर राज्यपालांनी सरकारसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
SHARES

महाराष्ट्राच्या राज्यपालांचं निवासस्थान असलेलं राजभवन सध्या चांगलंच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मोठमोठे नेते राज्यपाल भगसिंग कोश्यारी (Maharashtra governor, bhagat singh koshyari) यांच्या भेटीला जात असल्याने सगळ्यांचं लक्ष राजभवनातील घडामोडींकडे वेधलं गेलं आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसंच परीक्षांबाबतचे महत्त्वाचे महत्त्वाचे निर्णय या सगळ्यांवर राज्यपाल बारीक लक्ष ठेवून आहेत. 

त्यातच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राजभवनाला खर्चकपातीचे (Governor Koshyari announces series of austerity measures to cut expenses) निर्देश दिले आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्‍ध व्हावं या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरूवार २८ मे २०२० रोजी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.

आपलं एक महिन्याचं वेतन तसंच आगामी एक वर्षभर आपले ३० टक्के वेतन कोरोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.

हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना खडा सवाल

राज्यपालांच्या सूचना पुढीलप्रमाणे:

• राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरु करण्यात येऊ नये. केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी.

• पुढील आदेशांपर्यंत राजभवन इथं येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतीचिन्ह देऊ नये.

• पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करु नये.

• स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन इथं राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा.

• राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढं ढकलण्यात यावा.

• अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसंच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये.

• कुलगुरु व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेऊन करून प्रवास खर्चात बचत करण्यात यावी.

वरील उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये १० ते १५ टक्के बचत होईल असा अंदाज आहे. गुरूवारी जाहीर केलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरीही करोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तो महत्वपूर्ण ठरेल, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा - ‘या’ कारणासाठी पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा