Advertisement

‘या’ कारणासाठी पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

ही केवळ सदिच्छा भेट होती. शिवाय राज्यातील कोरोनाची स्थितीवरच या बैठकीत चर्चा झाली, असंं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (ncp leader praful patel) यांनी सांगितलं.

‘या’ कारणासाठी पवारांनी घेतली राज्यपालांची भेट
SHARES
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar meets maharashtra governor bhagat singh koshyari) यांनी सोमवार २५ मे २०२० रोजी अचानक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने सर्वांनाच या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, याबद्दल उत्सुकता लागून राहीली. परंतु ही केवळ सदिच्छा भेट होती. शिवाय राज्यातील कोरोनाची स्थितीवरच या बैठकीत चर्चा झाली, असंं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (ncp leader praful patel) यांनी सांगितलं. 

याआधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी देखील याचप्रमाणे राज्यपालांची भेट घेऊन सर्वांना बुचकळ्यात टाकलं होतं. त्याचपाठोपाठ शरद पवार देखील राज्यपालांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासोबतच सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्री आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

हेही वाचा - राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

त्यातच परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी विशेष ट्रेन उपलब्ध करून देताना केंद्राचं सहकार्य मिळत नसल्याचीही सरकारची तक्रार आहे. अशा सर्व घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर मध्यस्ती म्हणून शरद पवार राजभवनवर गेल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना आणि लाॅकडाऊनच्या काळात केंद्र असो किंवा राज्य सरकार प्रत्येकजण आपापल्या परिने काम करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात असताना याकामी राजकारण होऊ नये, असा सल्ला पवारांनी दिल्याचंही कळत आहे. 

ही बैठक संपून बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता, त्यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात आल्यापासून ते चहापानासाठी राजभवनवर येण्याची विनंती पवारांना करत होते. परंतु वेळ जुळून येत नव्हती. यंदा वेळ जुळून आल्यावर पवारांनी ही भेट घेतल्याचं पटेल म्हणाले.    

परप्रांतीयांसाठी अधिकाधिक विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात याव्यात यावरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं एकमत आहे. परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी अधिक ट्रेन उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. परंतु अजून तरी जास्त ट्रेन उपलब्ध झालेल्या नाहीत.  

संबंधित विषय
Advertisement