Advertisement

राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चक्क शनिवारी २३ मे २०२० रोजी राजभवन इथं जाऊन राज्यपालांची भेट घेतली.

राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत
SHARES

नको त्या समयी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (maharashtra governor bhagat singh koshyari,) यांच्यावर टीका करून नाहक वाद ओढावून घेणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चक्क शनिवारी २३ मे २०२० रोजी राजभवन इथं जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे पिता-पुत्राप्रमाणे संबंध आहेत. त्यांच्यात कुठलाही दुरावा नाही, असं वक्तव्य देखील राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी केलं.

राजभवनशी संबंध जोडू नका

राऊत आणि राज्यपाल यांच्यात तब्बल १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, राज्यपाल घटनात्मक प्रमुख आहेत. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली.

त्याचप्रमाणे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध देखील अत्यंत मधूर आहेत. अगदी पिता-पुत्राचे असतात त्याचप्रमाणे. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. दोघांमध्ये कुठलाही दुरावा नाही. फक्त जेव्हा विरोधक राजकारण करतात तेव्हाच आम्ही भाष्य करत असतो. मधल्या काळात मी देशभरातील घटनांविषयी मत व्यक्त केलं होतं. त्याचा मुंबईच्या राजभवनाशी संबंध जोडू नका, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - संजय राऊतांच्या राम मंदिरावरील ‘या’ वक्तव्याने सोशल मीडियावर भडका!

विरोधक एका बेटावर

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्यपालांना राज्य सरकारकडून वेळोवेळी सर्व माहिती देण्यात येते. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, हे राज्यपालांना माहीत आहे. परंतु विरोधक दुसऱ्या बेटावर असल्याने सरकार काय करतंय  यातलं त्यांना काहीच दिसत नाही. त्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही. आंदोलन करणं हा विरोधकांचा अधिकार आहे. पण कोरोनाच्या संकटात असं राजकीय आंदोलन करणं योग्य नाही. अशा कठीण प्रसंगी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहिलं पाहिजे. आपली मतं थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडून त्यावर चर्चा केली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

नाहक वाद

दरम्यान, कोराेना संकटामुळे विधान परिषद निवडणूक पुढं ढकलण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर नियुक्त करण्यात यावं, अशी मागणी राज्यपालांना करण्यात आली होती. परंतु ही मागणी राज्यपाल मान्य करत नसल्याने काही काळ मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर टांगती तलवार निर्माण झाली होती. यावरून संजय राऊत यांनी राज्यपालांवर तिखट शब्दांत टीका केली होती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. 

 हेही वाचा - वांद्र्यातील घटनेला भाजप देतंय जातीय रंग, संजय राऊतांचा आरोप


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा