Advertisement

संजय राऊतांच्या राम मंदिरावरील ‘या’ वक्तव्याने सोशल मीडियावर भडका!

राऊत यांनी गुरूवारी एका वृत्तवाहिनीला राम मंदिराच्या (ram mandir) बाबतीत अत्यंत मोजूनमापून प्रतिक्रिया दिली. मात्र या वृत्तवाहिनीने ती वेगळ्याच अर्था (अँगल)ने चालवल्याने सोशल मीडियावर राऊत यांच्या वक्तव्याविरोधात भडका उडाला.

संजय राऊतांच्या राम मंदिरावरील ‘या’ वक्तव्याने सोशल मीडियावर भडका!
SHARES

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. एखाद्या साध्या घटनेवर मतप्रदर्शन करून तिला सणसणीत करण्याची अनोखी शैली त्यांच्याकडे आहे. परंतु कोरोना संकटाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर जीभेला लगाम घालून राऊत शांत बसलेले असले, तरी वादविवाद त्यांची पाठ सोडताना दिसत नाहीय. राऊत यांनी गुरूवारी एका वृत्तवाहिनीला राम मंदिराच्या (ram mandir) बाबतीत अत्यंत मोजूनमापून प्रतिक्रिया दिली. मात्र या वृत्तवाहिनीने ती वेगळ्याच अर्था (अँगल)ने चालवल्याने सोशल मीडियावर राऊत यांच्या वक्तव्याविरोधात भडका उडाला.

देशातील कोराेनाचं संकट आणि लाॅकडाऊनचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असलेला परिणाम याकडे बहुतेक सर्वच वृत्तवाहिन्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं असलं, तरी मुख्य प्रवाहातील काही माध्यमं राम मंदिराच्या वार्तांकनालाही तेवढंच महत्त्व देत आहेत. याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम जन्मभूमी (Ayodhya ram janmabhumi) परिसरात सपाटीकरणाचं काम सुरू असताना तिथं अनेक प्राचीन स्तंभ आणि देवीदेवतांचे शिल्पावशेष सापडल्याने देशभरात चर्चेला उत आला. सोशल मीडियावर गुरूवारी “#RamMandirExisted” हा हॅशटॅग दिवसभर ट्रेंड करत होता. 

हेही वाचा- उद्धव ठाकरे नोकरशहांवर अवलंबून, असं का म्हणाले फडणवीस?

याच संदर्भात एक वृत्तवाहिनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पोहोचली. यावर मतप्रदर्शन करताना कोरोनाशी लढा देणं हेच सध्या आमच्यापुढील ध्येय असल्याचं वक्तव्य राऊत यांनी केलं. 

सध्या आमचं सगळं लक्ष कोरोनाविरोधातील लढाईकडे लागलं आहे. अवशेषांकडे लक्ष देण्यासाठी इतर लोकं देखील आहेत. आता भारत-पाकिस्तान युद्ध असो राम मंदिर असो किंवा इतर कुठलेही मुद्दे असोत ते दूर ठेवून सगळ्यांनी मिळून प्राधान्याने कोरोनाचा मुकाबला करण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले.

 

परंतु या वृत्तवाहिनीने बातमी चालवताना एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेची विचारधारा देखील बदलली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते म्हणतात, आता राम मंदिरचा मुद्दा बाजूला ठेवा, मंदिर वाट बघू शकतं, अशा अर्थाने बातमी चालवली.

यावर सोशल मीडियावर एकच भडका उडाला. संजय राऊन यांची टीका करणारे अनेक मेसेच व्हायरल व्हायला लागले. शिवसेना ही संधी आहेत. शिवसेना शवसेना झाली, अशा पद्धतीने ट्रोलिंग सुरू झालं. 

हेही वाचा - ‘हे’ आंदोलन तर मोदींनासुद्धा पटणार नाही- जयंत पाटील 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा