Advertisement

उद्धव ठाकरे नोकरशहांवर अवलंबून, असं का म्हणाले फडणवीस?

मुंबईतील स्थिती तर सरकारच्या केव्हाच हाताबाहेर निघून गेली आहे. पहिलं लाॅकडाऊन जाहीर झालं, तेव्हापासूनच सरकार धोरणात्मक निर्णय घेण्यात चुकलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरे नोकरशहांवर अवलंबून, असं का म्हणाले फडणवीस?
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपकडून सरकारला चोहोबाजूने घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्र बचाव, मेरा आंगण मेरा रणांगण आंदोलन देखील पुकारण्यात आलं आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे नोकरशहांवर अवलंबून असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी केला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

राज्यातील कोरोना संकटाच्या स्थितीचा आढावा घेताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. मुंबईतील स्थिती तर सरकारच्या केव्हाच हाताबाहेर निघून गेली आहे. पहिलं लाॅकडाऊन जाहीर झालं, तेव्हापासूनच सरकार धोरणात्मक निर्णय घेण्यात चुकलं आहे. मुख्यमंत्री हे नवीन आहेत, त्यांना प्रशासन चालवण्याचा कुठलाही अनुभव नसल्याने ते कुठलाही निर्णय घ्यायला घाबरतात. (CM is new and has no administrative experience), त्यामुळेच ते नोकरशहांवर अवलंबून आहेत, असं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, देवेंद्र फडणवीसांची मागणी

खाटा उपलब्ध नाही

खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा या कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आल्याची घोषणा सरकार करतं. प्रत्यक्षात मात्र मुंबईतील कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांत दाखल करून घेतलं जात नाही. खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. प्रत्येक बेडसाठी दिवसाला ३० हजार रुपये उकळले जात आहेत, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

मुंबईत अधिक चाचण्यांची गरज

मुंबईत दिवसाला १० हजार कोरोना चाचण्यांची क्षमता (covid-19 test in mumbai should be increase) असताना प्रत्यक्षात, मात्र दिवसाला केवळ ४ ते साडेचार हजार चाचण्याच केल्या जात आहेत. केवळ अधिक चाचण्या केल्याचा दावा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही. त्यामुळे मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज असल्याची मागणी याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली होती.

पॉझिटिव्ह येणार्‍या रूग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट अधिक आहे आणि मुंबईत ते त्याहून अधिक आहे. अशात एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या (एकाच व्यक्तीच्या दोन वा तीनदा चाचण्या केल्या जातात. रूग्णाला सुटी देण्यापूर्वी सलग दोन दिवस त्याची चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.) वजा केली, तर मुंबईत कोरोना पॉझिटिव्हीट रुग्णांचं प्रमाण हे जवळजवळ २२ टक्के आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा