Advertisement

वांद्र्यातील घटनेला भाजप देतंय जातीय रंग, संजय राऊतांचा आरोप

वांद्र्यात घडलेल्या घटनेला भाजपच्या नेत्यांकडून जातीय रंग (communal colour to bandra incident) देण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

वांद्र्यातील घटनेला भाजप देतंय जातीय रंग, संजय राऊतांचा आरोप
SHARES

वांद्र्यात घडलेल्या घटनेला भाजपच्या नेत्यांकडून जातीय रंग (communal colour to bandra incident) देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे पंतप्रधानांचंही न ऐकणारे भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (mumbai police) गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी केली आहे. 

काय म्हणाले कपिल मिश्रा?

भाजपचे नेते कपिल मिश्रा (Bjp leader kapil mishra)  यांनी वांद्र्यात अचानक उसळलेल्या गर्दीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत बोलताना मिश्रा म्हणाले की, हजारो लोकांना एकाच वेळी एकत्र येणं हे कुठल्याही प्लानिंगशिवाय शक्य नाही. ज्या पद्धतीने दिल्लीत बस भरुन भरुन गर्दी पाठवण्यात आली, तसाच षडयंत्राचा प्रकार मुंबईतही घडला. ट्रेन बंद असतानाही स्टेशनवर गर्दी कशी आली? काहीजण खूप घाणेरडं षडयंत्र (bandra incident conspiracy) रचत आहेत. 

हेही वाचा- वांद्र्यातील गर्दी हा पूर्वनियोजीत कट, किरीट सोमय्यांचा आरोप

असं म्हणतानाच कपिल मिश्रा यांनी तीन प्रश्न देखील उपस्थित केले. हे घरी जाणारे परप्रांतीय कामगार होते, तर त्यातील एकाजवळही बॅग किंवा सामान का नव्हतं? गर्दी जामा मशिदीच्या समोरच का झाली? महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन (lockdown) तर आधीच घोषित करण्यात आला होता, तरीही त्याच दिवशी हा गाेंधळ कसा? हे नक्कीच षडयंत्र आहे.

राऊतांचा पलटवार

त्यावर पलटवार करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जर कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं ठरलं आहे. तर पंतप्रधानांचंही न ऐकणारे कपिल मिश्रा वांद्रे प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न का करत आहेत? अशा वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे.

नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm naendra modi) यांनी देशातील लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा १४ एप्रिल रोजी केली. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक (bandra insidence) परिसरात हजारोंच्या संख्येने जमत परप्रांतीय कामगारांनी या लाॅकडाऊनचा विरोध केला. आपल्याला गावी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी त्यांची मागणी होती. यावेळी सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचां भंग झाल्याने पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. 

हेही वाचा- विनय दुबेचा मनसेशी संबंध काय? ‘हे’ आहे खरं कारण

दरम्यान भाजपचे नेतेआणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील वांद्र्यातील गर्दी हा पूर्वनियोजीत कट असल्याचा दावा केलाआहे. याबद्दचा एक संशयास्पद व्हिडिओ आपल्याला मिळाला असून तो मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केल्याचं सोमय्या म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा