Advertisement

वांद्र्यातील गर्दी हा पूर्वनियोजीत कट, किरीट सोमय्यांचा दावा

वांद्र्यात लाॅकडाऊनचा (lockdown) विरोध करण्यासाठी जमलेली गर्दी हा पूर्वनियोजीत कट होता, असा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी केला आहे.

वांद्र्यातील गर्दी हा पूर्वनियोजीत कट, किरीट सोमय्यांचा दावा
SHARES

वांद्र्यात लाॅकडाऊनचा (lockdown) विरोध करण्यासाठी जमलेली गर्दी हा पूर्वनियोजीत कट होता, असा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी केला आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यामातून त्यांनी हा आरोप केला आहे.

नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm naendra modi) यांनी देशातील लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा १४ एप्रिल रोजी केली. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक (bandra insidence) परिसरात हजारोंच्या संख्येने जमत परप्रांतीय कामगारांनी या लाॅकडाऊनचा विरोध केला. आपल्याला गावी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी त्यांची मागणी होती. यावेळी सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचां भंग झाल्याने पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. 

हेही वाचा - विनय दुबेचा मनसेशी संबंध काय? ‘हे’ आहे खरं कारण

विनय दुबेला अटक

अंतर्गत वाहतूक व्यवस्था बंद असतानाही हजारोंच्या संख्येने कामगार वांद्रे परिसरात जमले कसे?  याचा शोध घेत असताना पोलिसांना विनय दुबे (vinay dube arrested) याचा सोशल मीडियावरील व्हिडिओ सापडला. उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष असलेल्या विनय दुबे याने लाॅकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना चिथावणी देणारा एक व्हिडिओ दुबे याने सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडिओत लोकांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी न दिल्यास त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता. त्याच्या आवाहनानंतर वांद्र्यात मोठी गर्दी जमली. पोलिसांनी शोध घेत त्याला ऐरोलीतून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयास्पद व्हिडिओ

परंतु हे प्रकरण पूर्वनियोजीत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ माझ्याकडे आला असून त्यात दोन तरूणांचं संभाषण आहे. सर्वांना सांगा आम्हाला गावी जायचं आहे. अन्यथा १५ हजार रूपये रोख द्या, असं बोलत आहेत. तसंच पोलीस कुठे आहेत. मीडिया कुठे आहे, असं विचारतानाही ते दिसत आहेत. यावरून ही घटना पूर्वनियोजीत होती. हा व्हिडिओ मी मुंबई पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. तसंच याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत.

हेही वाचा - वांद्र्यातील गर्दी ही तर जनक्षोभाची सुरूवात, कष्टकऱ्यांची वेळीच सोय करा- प्रकाश आंबेडकर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा