Advertisement

इतर देशांची अवस्था बघा, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा- शरद पवार

इतर देशांची अवस्था बघून परिस्थितीचं गांभीर्य वेळीच ओळखा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

इतर देशांची अवस्था बघा, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा- शरद पवार
SHARES

कोरोना व्हायरसचा (Coronavirus,) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नागरी भागांत जमावबंदीचे आदेश लागू करूनही काही लोकं रस्त्यावर जमून गर्दी करत आहेत. रस्त्यावर वाहनांचीही गर्दी होत आहे. त्यामुळे इतर देशांची अवस्था बघून परिस्थितीचं गांभीर्य वेळीच ओळखा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. 

हेही वाचा - डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता आपली चूक कळली असेल : राज ठाकरे

इतर देशांची अवस्था बघा

शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून संवाद साधला. आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये ते म्हणातात की, कोरोनाचा (COVID-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने रविवारी नागरी भागात जमावबंदी आदेश केले. मात्र असं करूनही लोकं रस्त्यावर घोळक्याने जमा होऊन गर्दी करत आहेत. वाहनांनी जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. इतर देशांतील परिस्थिती ध्यानात घेता नागरिकांनी वेळीच गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

सरकारला सहकार्य करा 

इतर देशांतील नागरिकांनी तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक ती दक्षता घेतली आहे. आपणही तेच करायला हवं. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं अतिशय अपरिहार्य कारण असेल तरच घराबाहेर पडण्याचा विचार करावा. पोलीस व सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावं,' असं पवार यांनी व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाची अति गांभार्याने नोंद घेऊन पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. ही लढाई आपण जिंकणारच, गरज आहे संयम, समंजसपणा व योग्य दक्षतेची!

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करता आहात? मी सांगतो... घरी पुस्तक वाचत आहे, असं म्हणत त्यांनी स्वत:चं उदाहरण देखील दिलं आहे. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा