Advertisement

तर कर्फ्यूशिवाय दुसरा पर्याय नाही, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

लोकांनी घराबाहेर पडण्याचं न थांबवल्यास संपूर्ण महाराष्ट्रात कर्फ्यू (Curfew) लावण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (state home minister anil deshmukh) यांनी सोमवारी संध्याकाळी दिला.

तर कर्फ्यूशिवाय दुसरा पर्याय नाही, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
SHARES

कोरोना व्हायरसला (coronavirus) अटकाव घालण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करून देखील लोकांची वर्दळ थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर राज्य सरकारने कडक धोरण स्वीकारण्याचं ठरवलं आहे. लोकांनी घराबाहेर पडण्याचं न थांबवल्यास संपूर्ण महाराष्ट्रात कर्फ्यू (Curfew) लावण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (state home minister anil deshmukh) यांनी सोमवारी संध्याकाळी दिला.

बंद असूनही लोकं घराबाहेर

आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांची (COVID-19) माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्यात कोरोनाबाधीतांचा आडका १५ ने वाढून रुग्णांची संख्या ८९ वर गेली आहे. यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका असं आवाहन सातत्याने राज्य सरकारकडून नागरिकांना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशभरातील नागरिक रविवारी २२ मार्च रोजी दिवसभर घरात बसून होते. परंतु सोमवारची सकाळ उजाडताच  नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर उतरून गर्दी करायला सुरूवात केली. अनेकांनी तर लोकल ट्रेन, बस बंद असूनही खासगी वाहनांनी आॅफिसचा रस्ता गाठला. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर गर्दी झाली होती. 

लोकांना गांभीर्यच नाही

अखेर लोकांना अजूनही लाॅकडाऊनचं गांभीर्य कळलेलं नाही, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ट्विट करून देशातील नागरिकांना समज द्यावी लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा लोकांनी घराबाहेर पडू नये, रस्त्यांवर वाहनं घेऊन जाऊ नये, असं आवाहन केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतर देशातील स्थिती बघून गांभीर्य ओळखा असं आवाहन केलं. 

लोकांना सांगूनही समजत नसल्याने राज्यात सक्तीने संचारबंदी लागू करा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार अखेर राज्य सरकारनेही याबाबत कडक पवित्रा घ्यायचं ठरवलेलं दिसत आहे.

कर्फ्यूचा इशारा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं की, कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून राज्यात कलम १४४ (section 144) लागू करण्यात आलं आहे. आपण सर्वांनी घराबाहेर न पडता राज्य सरकारला आणि प्रशासनाला सहकार्य करावं, अन्यथा कर्फ्यू (Curfew) लावण्यावाचून पर्याय उरणार नाही, असा इशाराच देशमुख यांनी दिला आहे.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा