Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्या!

कोरोना उपयाययोजना संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीचा फोटो सर्वत्र व्हायकल होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्या!
SHARES

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक अशा महत्वाच्या बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. राज्यातील परीस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी ती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सर्वोतोपरी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजवणी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात राज्यातील प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठका घेऊन चर्चा करत आहेत.

कोरोना उपयाययोजना संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून ही बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्र्यांनीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसमोर आदर्श घालून दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ती संख्या ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत 125 होती. गुरुवारी दिवसभरात कोरोनाव्हायरग्रस्तांची संख्या फक्त मुंबईत 15 ने वाढली. मुंबई महानगरात दिवसभरात दोन कोरोनाग्रस्त महिलांचे मृत्यूही झाले. आता मुंबईत उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बस 77 वर पोहोचली आहे. या साथीचा पॅटर्न पाहता मुंबईत धोका वाढला आहे.

मुंबईच्या चाळीत आणि झोपडपट्टीसदृश घनदाट लोकवस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तरीही मुंबईकर अद्याप सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउन पुरेसं गांभीर्याने घेत नाहीत, असं चित्र आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या १५ जणाना ड़िस्जार्ज देण्यात आला आहे. मात्रा त्यातुनही कोरोनाचे नविन रुग्न सापडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मात्र हे सर्व करीत असताना नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक परिमंडळ मध्ये पोलीस उपायुक्तांच्या सही-शिक्याने याचे वाटप सुरु आहे. मात्र हे पासेस मर्यादीत असल्याने, ते काहीना मिळाले आहेत. तर काहीना मिळाले नाहीत.



हेही वाचा

'या' अभिनेत्यानं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा