Coronavirus cases in Maharashtra: 351Mumbai: 181Pune: 37Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 9Thane: 9Navi Mumbai: 8Ahmednagar: 8Vasai-Virar: 6Yavatmal: 4Buldhana: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 16Total Discharged: 41BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

यंदा रेडीनेकनरच्या दरांनाही होणार उशीर

सरकारकडून दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेडीरेकनरचे दर (Redirecionar rates) जाहीर करण्यात येतात. परंतु लाॅकडाऊनमुळे (lockdown) राज्य सरकारच्या महसूल विभागातील कामावरही याचा परिणाम झाल्याने यंदा रेडीरेकनरचे दर उशीरा जाहीर होणार आहेत.

यंदा रेडीनेकनरच्या दरांनाही होणार उशीर
SHARE

सरकारकडून दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेडीरेकनरचे दर (Redirecionar rates) जाहीर करण्यात येतात. परंतु लाॅकडाऊनमुळे (lockdown) राज्य सरकारच्या महसूल विभागातील कामावरही याचा परिणाम झाल्याने यंदा रेडीरेकनरचे दर उशीरा जाहीर होणार आहेत. 

दरवर्षी मार्चअखेरीस सरकार रेडीरेकनर दर जाहीर करते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे  यावर्षीचे रेडीरेकनर दर ३१ मार्चला जाहीर होणार नाहीत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर दर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (revenue minister balasaheb thorat) यांनी दिली.

हेही वाचा - लोकांना देणार धान्याऐवजी थेट पीठ, महसूलमंत्र्यांची माहिती

रेडीरेकनर म्हणजे काय?

मूल्य दर तक्ते म्हणजे इंग्रजी भाषेत रेडी रेकनर. बांधकाम व जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदणीसाठी राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून (revenue department) मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. ही आकारणी करण्यासाठी संबंधित जमीन व इमारतीचे वेगवेगळ्या निकषानुसार व विभागानुसार वार्षिक बाजारमूल्य ठरवलं जातं. त्याला ‘रेडीरेकनर’ असं म्हटलं जातं. 

असे ठरतात दर

बांधकामाचा दर्जा, परिसरातील विकासकामे, पायाभूत सुविधा, जागेची मागणी इत्यादी बाबींचा आढावा घेतल्यानंतर त्याचे कमी वा अधिक दर ठरवले जातात. परंतु मागील काही वर्षांपासून सातत्याने रेडीरेकनरचे दर वाढतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे मालमत्तेच्या किंमती वाढून त्याचा सर्वसामान्य खरेदीदारांवर बोजाच पडत आहे. 

बिल्डर, बिगरशेती जमिनी, शेतजमिनी या घटकांशी (property rates) रेडीरेकनरचा थेट संबंध येत असतो. रेडीरेकनर दराच्या आधारेच बांधकाम व्यावसायिक किंवा जमिनीची विक्री करणारे व्यावसायिक आपापले दर ठरवत असतात. त्यामुळे बांधकाम व्यवसायात रेडीरेकनर दराला विशेष महत्त्व असतं.

हेही वाचा - ... म्हणून जयंत पाटील यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका


संबंधित विषय
ताज्या बातम्या