पत्नीसाठी धावपळ सुरू

 Andheri
पत्नीसाठी धावपळ सुरू
पत्नीसाठी धावपळ सुरू
पत्नीसाठी धावपळ सुरू
पत्नीसाठी धावपळ सुरू
पत्नीसाठी धावपळ सुरू
See all
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - निवडणुकांची वेळ जवळ आल्यानंतर बऱ्याच लोकप्रतिनिधींना ख़डबडून जाग आल्याचे दिसून येत आहे. मग हे नगरसेवक आपापल्या प्रभागात विकासकामांचा धडाका लावतात. टिपू सुलतान मार्गावरील तहसीलदार कार्यालयाशेजारी मुंबई महानगरपालिकाचे गणपतराव आंब्रे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानकडं गेल्या 10 वर्षांपासून कुणीही लक्ष दिलेलं नाही. पण आता निवडणुका जवळ आल्यावर काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक मोसिन हैदर उद्यानाच्या सुशोभिकरणाचं काम सुरू करत शिल्लक फंड वापरून काम मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहेत. हैदर यांचा पूर्वीचा प्रभाग क्र.65 ओबीसी राखीव झाला असून या वेळी हैदर यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांचा जुना प्रभाग क्र. 66 सर्व साधारण महिला राखीव विभागात गेल्यानं पत्नीला मैदानात उतरवण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. येत्या तीन महिन्यांत शिल्लक निधी वॉर्डात खर्च करून विकासकामाचा बार उडवून देण्याचा नगरसेवकांचा मानस असल्याचं निदर्शनास येत आहे.

Loading Comments