Advertisement

'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आली जाग'


'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आली जाग'
SHARES

कांदिवली - यंदा पावसाळ्यात कांदिवलीतील अनेक रस्ते खडड्यात गेले. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यावेळी सर्वांनीच खड्डयांचं राजकारण केलं. मात्र येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवली पूर्वेकडील नगरसेवक रामअशिष गुप्ता यांनी गावदेवी रोड, एस. व्ही. रोडपासून ते सबवेपर्यंतचा रोड, एम .डी. रोड, आकुर्ली क्रॉस रोड क्रमांक 2, सुहास मोदी रोड या रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम सुरू केलंय. निवडणुका तोंडावर असताना नगरसेवकांनी रस्त्यांचं काम सुरू केल्यानं इथल्या रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. इतके दिवस रस्ते खड्डयात होते, त्यावेळी नगरसेवक कुठे होते, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. 
याबाबत मुंबई लाइव्हने नगरसेवक गुप्ता यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता, त्यांनी राज्याबाहेर असल्याचं कारण दिलं. याबाबत त्यांच्या कार्यालयात विचारणा केली असता रस्त्यांच्या दुरुस्तीचं फंड एकत्र पास झाल्यानं सर्व कामं एकत्र सुरू केल्याचं सांगण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा