अंधेरी - मालपा डोंगरी क्रमांक ३ मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभा मंडपात नगरसेविका सुनिता इलावडेकर यांनी त्यांच्या निधीतून लाद्या बसवण्याचं काम सुरू केलं आहे. या वेळी शाखाप्रमुख सदानंद परब, महिला शाखा संघटक वैशाली दळवी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश शेलार आदीही उपस्थित होते. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होईल, असं या वेळी इलावडेकर यांनी सांगितलं.