नगरसेवक लागले कामाला

Marine Drive
नगरसेवक लागले कामाला
नगरसेवक लागले कामाला
नगरसेवक लागले कामाला
See all
मुंबई  -  

गिरगाव - सी विभागातील प्रभाग क्रमांक 222 चे शिवसेनेचे नगरसेवक सुरेंद्र ठाकूर यांच्या निधीतून रविवारी ठाकूरद्वार परिसरात नागरिकांच्या घरोघरी जाऊन मोफत आरोग्य तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या शिबीरात ईसीजी, ब्लड चेकअप, शुगर चेकअप मोफत करण्यात आलंय. वातावरणातील बदलाचे सर्वत्र परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य नीट रहावे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं नगरसेवक सुरेंद्र ठाकूर यांनी ’मुंबई लाईव्ह’ला सांगितले. या उपक्रमात गिरगावमधील सर्व युवासनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन शिबीरात सहभागी झाले होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.