नगरसेवकांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात

  Mumbai
  नगरसेवकांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात
  मुंबई  -  

  घाटकोपर – महापालिका निवडणुकीत बहुतांश वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. एन वॉर्डमधील अकरा प्रभागांपैकी सहा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणाला उमेदवारी देऊन सत्ता त्यांच्या हातात देण्यापेक्षा आपल्याच घरात रहावी म्हणून नगरसेवकांनी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

  प्रभाग १२४ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक हारुन खान यांची पत्नी ज्योती हारुन खान, प्रभाग १२५ शिवसेनेचे सुरेश आवळे यांची पत्नी रुपाली आवळे, प्रभाग १२६ मनसेचे संजय भालेराव त्यांची पत्नी डॉ. अर्चना भालेराव आणि प्रभाग १२८ शिवसेनेचे दीपक हांडे यांची पत्नी अश्विनी हांडे या चारही नगरसेवकांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.