प्रभाग आरक्षित झाल्याने चिंता

 BMC office building
प्रभाग आरक्षित झाल्याने चिंता
BMC office building, Mumbai  -  

परळ - शिवडी-परळ विभागाची शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. येथील प्रभाग क्रमांक 198 चे नगरसेवक संजय आंबोले आणि प्रभाग 200 च्या नगरसेविका वैभवी चव्हाण यांनी येथे शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या सोडतीत हे दोन्ही प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने येथील शिवसेनेचे कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत.

नवे प्रभाग शोधावे लागणार असल्याने उमेदवारांमधून चिंता व्यक्त होत आहे. तरी येथील विद्यमान आमदार अजय चौधरी हे शिवसेनेचे असल्यामुळे जातीचा फरक जरी झाला असला तरी चिंतेचे कोणतेही कारण नाही अशी चर्चा रंगत आहे. त्याचप्रमाणे प्रभाग 195 देखील अनुसूचित करण्यात आल्याने काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांना चांगलाच धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक पदावर राहून प्रभागात सामाजिक काम करणाऱ्या मोरे यांना खुर्ची रिकामी करावी लागणार आहे. मात्र 195 या प्रभागात 90 टक्के लोक अनुसूचित जातीचे असल्याने प्रभाग अनुसूचित झाल्याचे समाधान येथील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

Loading Comments