पत्रकारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 New Delhi
पत्रकारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
पत्रकारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
See all

नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या नवी दिल्ली दौऱ्यानिमित्त पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रकारांच्या दिलखुलास गप्पा झाल्या. पत्रकारांच्या अधिस्वीकृती कार्डाच्या निमित्ताने विविध बाबींची चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संसदेच्या विशेष दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समितीच्या सर्व सदस्यांची भेट घेतली. यावर, एका सदस्याने मराठीत बोलू का? असं विचारले असता होय, आम्हाला सगळे चालते असे म्हणत पंतप्रधानांनी आपल्या संवादाची सुरुवात केली. या चर्चेवेळी त्यांनी देशाच्या विकासाबद्दल आपल्या कल्पना सांगितल्या. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची तुलना केल्यास आपल्याला काय जाणवते ? या प्रश्नावर दोन्ही राज्यांना संघर्षाचा वारसा आहे आणि खडतर स्थितीतून वाटचाल करायची सवय सुद्धा असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. चर्चेदरम्यान, सध्या सोशल मिडियावर काय काय लिहिले जातेय ते ही आपण वाचत असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी, राज्याचे माहिती महासंचालक बृजेश सिंह, सदस्य प्रसाद काथे, विनोद जगदाळे, योगेश जाधव आणि लक्ष्मीदास इनामदार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

Loading Comments