नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाणांचं टीकास्त्र


  • नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाणांचं टीकास्त्र
  • नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाणांचं टीकास्त्र
SHARE

गोरेगाव - सरकारनं 1000 आणि 500 च्या जुन्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या निर्णयाला आता दोन महिने होतायत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 'काळा पैैसा नष्ट करणं, भ्रष्टाचार थांबवणं आणि नकली नोटांना आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र अजूनही यापैकी कोणताच उद्देश साध्य झालेला नाही,' अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.

पार्वती शंकरराव चव्हाण ट्रस्टतर्फे गोरेगाव विचार मंच आयोजित केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर व्याख्यानाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. या कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयासह आर्थिक धोरणावर सडकून टीका केली. आपला निर्णय चुकला हे पंतप्रधानांनाही कळून चुकलंय. त्यामुळे आता त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यांनीही या वेळी पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली. येणाऱ्या काळात अर्थव्यवस्था डगमगणार आहे. मोदींनसुद्धा कळले आहे की त्यांचा निर्णय चुकलाय, असं मत पाटील यांनी व्यक्त केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या