Advertisement

शरद पवार यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह

शरद पवार यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. डाॅक्टरांच्या सल्लनुसार पवार यांनी पुढील ४ दिवस कुणालाही न भेटण्याचं ठरवलं आहे.

शरद पवार यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ६ पोलिसांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट होताच तातडीने शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. डाॅक्टरांच्या सल्लनुसार पवार यांनी पुढील ४ दिवस कुणालाही न भेटण्याचं ठरवलं आहे. (covid 19 test negative of ncp chief sharad pawar)

खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानातील संपूर्ण स्टाफची तसंच सुरक्षा ताफ्यातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ६ पोलिसांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं, तर इतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह. त्यानंतर शरद पवार यांची रॅपिड अँटिजेन डीटेक्शन टेस्ट घेण्यात आली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनीही पुढील ४ दिवस कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पुढचे काही दिवस कोणताही दौरा न करण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आली आहे. शरद पवार आवश्यक सर्व काळजी घेत आहेत. चिंतेचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मागील काही दिवसांमध्ये शरद पवार यांनी  पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा अशा अनेक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील ते सातत्याने घेत आहेत. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग राखता यावं म्हणून सुरक्षा रक्षक नेहमीच दक्ष असायचे. या दरम्यानच एखाद्या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने सुरक्षा रक्षकांना कोरोना संसर्ग झाला असावा, अशी शक्यताही टोपे यांनी व्यक्त केली.

 हेही वाचा - नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, शरद पवारांनी पार्थला फटकारलं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा