Advertisement

सीपीआयचा ८ आॅक्टोबरला राज्यव्यापी महामोर्चा

राफेल घोटाळा, ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना सुखरूप देशाबाहेर पळून जाण्यास वाव देण्यासारखे एक ना अनेक आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष सरकारविरोधात महामोर्चा काढणाार असल्याची माहिती पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली आहे.

सीपीआयचा ८ आॅक्टोबरला राज्यव्यापी महामोर्चा
SHARES

'वर्षाला २ कोटीप्रमाणे ४ वर्षांत ८ कोटी नोकऱ्या देऊ', 'प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू', 'काळा पैसा परत आणू' यासारखी अनेक आश्वासनं देत भाजपा सरकार केंद्रात सत्तेत आली. पण गेल्या ४ वर्षांत भाजपानं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. उलट जनतेला महागाईच्या खाईत लोटलं आहे. देशातला प्रत्येक नागरिक महागाईनं त्रस्त आहे. तर दुसरीकडं संविधान बदलण्याची भाषा भाजपाकडून होत आहे, राफेल घोटाळा, ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना सुखरूप देशाबाहेर पळून जाण्यास वाव देण्यासारखे एक ना अनेक आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष सरकारविरोधात महामोर्चा काढणाार असल्याची माहिती पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली आहे.


कुठून होणार सुरूवात ?

'मोदी हटाव देश बचाव', 'भाजपा हटाव संविधान बचाव' असा नारा देत ८ आॅक्टोबरला 'सीपीआय'ने राज्यव्यापी महामोर्चाची हाक दिली आहे. ८ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान इथून महामोर्चाला सुरूवात होणार असून पुढं हा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे. पुढे मोर्चाचे रूपांतर सभेत होणार असून इथं केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात निदर्शन केली जातील, असंही रेड्डी यांनी सांगितलं आहे. तर या राज्यव्यापी मोर्चात राज्यभरातील किमान १ लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावाही रेड्डी यांनी केला आहे.


सरकारचा निषेध

केंद्र सरकारप्रमाणं राज्य सरकारनंही आपली अनेक आश्वासन पाळलेली नाहीत. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन प्रकल्प आणत शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं जात आहे, शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही, हजारो कुटुंब वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहत आहेत, असं म्हणत हे सरकारही अपयशी ठरल्याचं सांगत राज्य सरकारचाही निषेध या मोर्चात केला जाईल, असं रेड्डी यांनी सांगितलं.



हेही वाचा-

दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला प्रयाण!

गीता, बायबल, कुराणापेक्षाही संविधान प्रिय- मुख्यमंत्री



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा