टाईमपास फेम प्रथमेश परबही प्रचारात!

वरळी - मुंबई महापालिकेची रणधुमाळी सध्या चांगलीच रंगात आलेली आहे. निवडणूक म्हटली तर प्रत्येक उमेदवार आपण विजयी होण्यासाठी काही ना काही नवीन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतच असतो. वरळीत ही हेच चित्र पाहायला मिळाले. भाजपा उमेदवार सुशील शिलवंत यांनी चक्क टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब आणि सुप्रसिद्ध क्रिकेटर विनोद कांबळी यांना प्रचारासाठी उतरवलं होतं.

Loading Comments