• अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
  • अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
SHARE

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. पूर्वतयारी नसताना घेतलेला हा निर्णय तकलादू आहे. नोटा बदलण्याच्या मनस्तापामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. या निर्णयावर उद्धव ठाकरे टीका करत असले, तरी सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे तेही याला जबाबदार आहेत, असंही ते म्हणाले. शनिवारी काँग्रेसच्या गांधीभवन कार्यालयामध्ये परभणीतल्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या