राम मंदिरात शिवसेना-भाजपाचा राडा !

  Share
  Now
  मुंबई  -  

  राममंदीर - मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील राममंदिर स्टेशन उद् घाटनाच्या कार्यक्रमात भाजपा, शिवसेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, तर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात आली. भाषण सुरु होऊनही घोषणाबाजी न थांबल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना संताप अनावर झाला. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात येत होती. मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत, अशी टिप्पणी रावते यांनी केली. शिवाय भाजपा कार्यकर्ते बोलू देत नसल्याचं सांगत रावते माईक सोडून निघून गेले. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून राममंदिर हे नवं स्टेशन तयार झालं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या स्टेशनचं उद् घाटन करण्यात आलं. उद् घाटनासाठी व्यासपीठावर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, रविंद्र वायकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.