दानवेंच्या विरोधात शिवसेना

  Pali Hill
  दानवेंच्या विरोधात शिवसेना
  मुंबई  -  

  मुंबई - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या लक्ष्मीदर्शनाच्या वक्तव्याविरोधात शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील तूतू-मैंमैं संपता संपत नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तक्रार दाखल केल्यानंतर आता औरंगाबादचे शिवसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी यांनी तक्रार दाखल केलीय. सत्तेत भागीदार असलेल्या मित्रपक्षाच्या प्रदेशाध्यक्षांविरोधातच शिवसेनेने तक्रार दाखल केलीय. पैठण येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना दानवेंनी मतदारांनी मतदानाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या लक्ष्मीचे स्वागत करा, तिला नाकारू नका, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेऊन त्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिसला उत्तर देताना त्यांनी आपण लक्ष्मी या शब्दाचा उल्लेख देवता या अर्थाने केल्याचं स्पष्टीकरण दिलंय. त्यानंतर आता औरंगाबादचे शिवसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी यांनी मंगळवारी मुंबईत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांकडे दानवेंच्या वक्तव्याची तक्रार दाखल केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.