Advertisement

ललित मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा


SHARES

मुंबई - इंडियन प्रीमियर लीगचा माजी अध्यक्ष ललित मोदीच्या अडचणीत वाढ झालीय. त्याला इंग्लंडमधून भारतात आणण्याला मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टानं परवानगी दिलीय. या कोर्टानं सक्तवसुली संचालनालयाला मोदीविरोधात अजामीनपात्र वाॅरंट बजावण्यासाठी ब्रिटिश सरकारला लेटर ऑफ रिक्वेस्ट ( LR ) पाठवण्याचीही अनुमती दिली आहे.
'हे लेटर ऑफ रिक्वेस्ट आता पराष्ट्र व्यवहार खात्याकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर ते पुढील कारवाईसाठी इंग्लंडमधील संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात येईल,' अशी माहिती ईडीच्या वकिलांनी दिली.
४२५ कोटींच्या आयपीएल टेलिव्हिजन राइट्स घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला ललित मोदींची चौकशी करायची आहे. मात्र ईडीच्या कोणत्याही वॉरंटला मोदीनं उत्तर दिलं नव्हतं. त्यानंतर आठ नव्हेबरला ईडीनं मोदीविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
या प्रकरणी क्रिकेटरसिकांनी व्यक्त केलेली मतं पहा व्हिडीयोत...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा