Advertisement

खासदार गावितांच्या गाडीने हरणाला चिरडले

28 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. एसयुव्ही कार संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्य दरवाज्याकडे जात होती. त्यावेळेस गांधी टेकडीजवळ हरणाला गाडीची धडक बसली.

खासदार गावितांच्या गाडीने हरणाला चिरडले
SHARES
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मालकीच्या गाडीने बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमधील हरणाला चिरडल्याची घटना नोव्हेंबरमध्ये घडली होती. या प्रकरणी वन अधिकाऱ्यांनी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होत संजय गांधी नॅशनल पार्कचे डिरेक्टर अन्वर अहमद यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

संजय गांधी नॅशनल पार्क मधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. एसयुव्ही कार संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्य दरवाज्याकडे जात होती. त्यावेळेस गांधी टेकडीजवळ हरणाला गाडीची धडक बसली. मुख्य द्वारावर चालकाने याप्रकरणी माहिती दिली. यानंतर हरणाला नॅशनल पार्कच्या पशू इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे हरणाला मृत घोषित करण्यात आले आहे.

माञ संजय गांधी उद्याना वाहनाच्या धडकेत प्राणी मरण्याची हा काही पहिलीच घटना नाही. रिवर  ग्रुपमधील सदस्याद्वारे मागवण्यात आलेल्या आरटीआय माहितीद्वारे विविध अपघातात 2017 मध्ये तब्बल 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच नॅशनल पार्कमध्ये ड्रायव्हिंग कायदे अधिक कडक करून वाहकांना ते पाळण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच लवकरच एक अभियानदेखील सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल पार्कमध्ये प्रतितास 20 किमी पेक्षा कमी वाहन मर्यादेचं आवाहन करणारे अनेक बोर्ड्स लावण्यात आले आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा