Advertisement

भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळानं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली.

भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट
SHARES

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळानं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट, अंबानी यांच्या निवासस्थाबाहेर सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या या प्रकरणांवरुन राज्य सरकारविरोधात तक्रार भाजपने राज्यपालांकडे केली आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट समोर आणलं. तत्कालिन सीआयडी अधिकारी रशअमी शुक्ला यांनी तयार केलेला फोन टॅपींगचा अहवाल आणि कॉल रेकॉर्डची माहिती त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांनी दिली. दरम्यान, त्यांनी काल पत्रकार परिषदेत या प्रकरणाची तक्रार राज्यपालांकडे करणार असल्याचं सांगितलं होते. त्याचं पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारची तक्रार केली.



हेही वाचा -

महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचं वसुलीचं टार्गेट १०० कोटी असेल तर, इतरांचं..?

“मुख्यमंत्री पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा