• परिपत्रक काढणाऱ्यांवर कारवाईची मागणी
  • परिपत्रक काढणाऱ्यांवर कारवाईची मागणी
  • परिपत्रक काढणाऱ्यांवर कारवाईची मागणी
SHARE

मुंबई - सरकारी कार्यालयात देव देवतांचे फोटो लावता येणार नाही असे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. गुरुवारी सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी धार्मिक फोटोंबाबत काढलेले परिपत्रक मागे घ्या या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य सरकारने हे परिपत्रक काढले नसून, ग्रामविकास मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हे परिपत्रक काढल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकार हे हिंदुत्ववादी पक्षांनी बनविलेले असताना असा निर्णय कसा काय घेतला जावू शकतो? असा प्रश्न उपस्थित करत जर हा निर्णय मागे घेतला नसता तर शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक झाली असती अशी प्रतिक्रिया मुंबई लाइव्हशी बोलताना दिली. दरम्यान हिंदू जनजागरण समितीचे प्रवक्ते अरविंद पानसरे यांनी मुख्यमंत्र्यांनी परिपत्रक मागे घेण्याचा जो निर्णय घेतला त्याचे स्वागत केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या