शिवाजी स्मारकाला पर्यायी जागा आहे?

 Mumbai
शिवाजी स्मारकाला पर्यायी जागा आहे?

मुंबई - अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक राज्य सरकारकडून उभारले जाणार आहे. मात्र या स्मारकाला मच्छिमारांनी आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवल्याने या स्मारकावरून आधीच वाद रंगला आहे. आता 'आपली मुंबई सिटीझन फोरम'नेही प्रस्तावित जागेत स्मारक उभारण्यास विरोध केल्याने आता या वादात आणखी भर पडणार आहे. प्रस्तावित जागेत स्मारक उभारणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अवघड नव्हे तर अशक्यच असल्याचे म्हणत 'आपली मुंबई'ने राज्य सरकारकडे स्मारकाची जागा बदलण्याची मागणी केली आहे.

3600 कोटी रुपये खर्च करत राजभवनापासून 1.2 किमी तर एचटुओ जेट्टी, गिरगावपासून 3.60 किमी अंतरावर असणाऱ्या 15.96 हेक्टरच्या खडकावर स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारला आधी बेट उभारावे लागणार असून यासाठी 10 लाख टन खडक आणि सात लाख टन वाळू लागणार आहे. म्हणजे याचाच खर्च 1 हजार कोटींच्या वर जाणार आहे. त्यामुळे इतका खर्च का आणि कशासाठी? असा सवाल करत आपली मुंबईने भाऊचा धक्का इथल्या क्रॉस आयलँड नावाच्या तयार बेटावर स्मारक बांधण्याची सूचना सरकारला पत्राद्वारे केल्याचे राव यांनी सांगितले आहे.

स्मारक बांधणे अभियांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण काम असल्याने हे स्मारक नक्की बांधले कसे जाणार? हा प्रश्नच असल्याचे म्हणत राव यांनी स्मारकाच्या कामातील अनेक त्रुटी आणि अशक्य बाबीही सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. तर कोट्यवधी रुपये खर्च करत स्मारक बांधले तरी हे स्मारक तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे स्मारक बाराही महिने सुरू राहील आणि शिवभक्त तसेच पर्यटकांना स्मारक पाहात येईल, यासाठी क्राॅस आयलँड येथे स्मारक उभारावे अशी मागणी राव यांनी केली आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्यांनी आता जागा बदलणे शक्य नसल्याचे म्हणत ही मागणी फेटळाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments