SHARE

प्रभादेवी - मोदींच्या निर्णयामुळे देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. रविंद्र नाट्य मंदिर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आणि ठाणे येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या वेळी ते बोलत होते.

जनतेचे कसे हाल होत आहेत आणि मोदी सरकारचा निर्णय कसा योजना बद्ध नव्हता यावर देखील भाष्य केले. यावेळी त्यांनी भारतातील बॅंकांची व्यवस्था, एटीएमची अवस्था या संदर्भात आकडेवारीच्या यादीचे वाचन देखील केले. सध्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला आपण कुठल्या दिशेने चाललोय, हे कळेनासे झाले आहे, सरकार दररोज बँकेतून पैसे काढण्यासंदर्भात वेगवेगळ्या घोषणा आणि निर्णय जाहीर करत आहे. सरकारची तयारी नसतानाही एवढा मोठा निर्णय का घेतला, असा सवाल या वेळी राज यांनी केला.
तसंच नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवरही टीकास्त्र सोडले. मोदींना सकाळी गोव्यात भाषण देताना हुंदका येतो आणि संध्याकाळी तुम्ही सांगता पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. मोदींच्या या वर्तनाची सांगड नेमकी कशाप्रकारे घालायची, असा प्रश्न राज यांनी या वेळी विचारला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चलन बदलाचा निर्णय योजनाबद्ध नाही .
• चलन बदलाचा निर्णय मनसे या पक्षासाठी उत्तम आहे, कारण मनसेला माणसांची कमतरता नाही.
• इतर राजकीय पक्षांचा काळा पैसा बाहेर काढताना भाजपकडे रग्गड पैसा आहे, असे होता कामा नये.
• हा निर्णय जर फसला तर देश खड्यात जाईल.
• सध्या विरोधात बोलता येत नाही आणि सत्यही स्वीकारता येत नाही अशी अवस्था भाजपच्या नेत्यांची
• पंतप्रधानांनी अभ्यासपूर्ण निर्णय घेणे गरजेचे होते.
• चलन बदलाच्या निर्णयापासून रोज एक नवीन नियम केला जातो.
• पंतप्रधानांनी भविष्याचा निर्णय घेताना विचार केला नाही अशा प्रतिक्रीया सर्वसामान्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
• एका दिवसात देशात काळे पैसे ठेवणाऱ्यांच्या संपत्तीवर धाड टाका, जनता भाजपाला डोक्यावर घेईल
• एवढ्या मोठ्या आपल्या देशात फक्त 4.5 टक्के लोक इनकम टॅक्स भरतात
• गरीबांकडची रोख म्हणजे काळा पैसा नव्हे
• अरुण जेटली यांनी पंजाबच्या निवडणूकीत 83 लाख रोख रक्कम दाखवली होती मग तो काळा पैसा होता का ?
• पंतप्रधान सांगतात नोटांच्या कागदाचे टेंडर 10 महिन्यांपूर्वी काढले आहे, परंतु साफ चुकीच आहे ते 8 दिवसांपूर्वी काढण्यात आले आहे.
• लोकशाहीत मत्र्यांना देखील कल्पना नाही असा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाच कसा
• काळ्या पैशांचा तिरस्कार करता तर मोदी निवडणूकीत निवडून आले कसे ?
• देशात दंगली घडण्याची भीती व्यक्त केलेली, काल सुप्रीम कोर्टानेही तेच मत नोंदवलं
• आजही भाजपने निवडणूकीच्या पैशांचा हिशोब दिलेला नाही
• भाजप राष्ट्रीय सेवा संघ यावर कुणीच काही बोलत नाही
• दोन हजारच्या नोटा छापायला सहा महिन्यांपूर्वी सुरुवात, मग आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची सही कशी?
• काँग्रेसच्या काळात जो व्यक्ती जेल मध्ये होता तो आता भाजप पक्षाचा खासदार आहे, हे देशाचं दुर्दैव म्हणायच का?
• रोज नवीन उपाय शोधतात, कधी मर्यादा वाढवतात, कधी वृद्धांसाठी रांगा, याबाबत आधी विचार केलाच नव्हता, अशा निर्णयामुळे भविष्य भीषण आहे.
• हा प्रकार कसा आणि कुठपर्यंत जाईल याचा काहीच अंदाज सध्याच्या अवस्थेत लावणे कठीण आहे.
• आज चलन बदलामुळे वर्तमान पत्रातल्या जाहिराती कमी झाल्या आहेत.
• पंतप्रधानांनी दिलेल्या 50 दिवसात छान काहीतरी घडो एवढीच अपेक्षा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या