Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

नोटाबंदीमुळे दहशतवादाला लगाम बसणार - पर्रिकर


नोटाबंदीमुळे दहशतवादाला लगाम बसणार - पर्रिकर
SHARES

कांदीवली - 500-1000 नोटाबंदीमुळे दहशतवादाला लगाम बसेल अशी प्रतिक्रीया केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलीय. तसेच ड्रग्स विक्रीवरही यामुळे लगाम बसेल असही त्यांनी यावेळी सांगितलंय. काश्मिरमध्ये नागरिक 500 रुपयांसाठी दगडफेक करणार नसल्याचंही ते यावेळी म्हणालेत. अ़डिच लाखापेक्षा अधिक रक्कम डिपॉजिट करा आणि हिशोब दया असं सांगत नागरिकांनी काळजी करू नका असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं. कांदीवलीमधील सीओ़डी प्रकल्पातील इमारतीच्या पुर्नविकासाचा प्रश्न नुकताच आमदार अतुल भातखळकर यांच्यामुळे सुटला. अतुल भातखळकर यांनी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्याशी पाठपुरावा करत सीओडी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. यामुळे पर्रिकर यांचे आभार मानण्यासाठी सोमवारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. तर चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार योगेश सागर, दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर , आमदार भाई गिरकर आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा