Advertisement

अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy cm Ajit pawar) यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy cm Ajit pawar) यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. सोमवारपासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. 

याआधी शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. शांत स्वाभावाचे नेते अशी सुभाष देसाई यांची ओळख आहे. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू आक्रमकपणे मांडणारा नेत्याची आवश्यकता होती. त्यानुसार स्पष्टवक्ते आणि आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या अजित पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. 

एकूळा ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत (vidhan parishad) २०२० मध्ये अनेक आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. सद्यस्थितीत विधान परिषदेत भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ सदस्य, काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी १३ आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. तर, जून २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदार महाविकास आघाडीतर्फे (maha vikas aghadi) निवडले जातील.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी तालिका सभापतींच्या नावांची देखील घोषणा केली. यांत शिवसेना सदस्य गोपिकीशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपाचे अनिल सोले आणि शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका सभापती म्हणून काम पाहतील. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा