मुंबई महानगरपालिका एमआयएमचं लक्ष्य

 Mazagaon
मुंबई महानगरपालिका एमआयएमचं लक्ष्य
मुंबई महानगरपालिका एमआयएमचं लक्ष्य
मुंबई महानगरपालिका एमआयएमचं लक्ष्य
मुंबई महानगरपालिका एमआयएमचं लक्ष्य
See all

भायखळा - येथील नागपाडा जंक्शन येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या वतीनं सभा घेण्यात आली. या सभेत एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठ्या जनसमूहाला संबोधित केलं. या सभेला भायखळ्याचे एमआयएम आमदार वारिस पठाण, औरंगाबादचे आमदार इम्तियाझ जलील आणि एमआयएमचे मुंबई अध्यक्ष शकीर पटनीही उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही सभा घेण्यात आली. या सभेत एमआयएम कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश ओवेसी यांनी दिले.

'मुंबई महानगरपालिकेचं वार्षिक बजेट 37 हजार कोटींचं आहे. मुंबईत 21 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे. त्यानुसार 7 हजार 770 कोटी रुपये मुस्लिमांच्या विकासासाठी खर्च व्हायला हवे, जे होत नाहीत. आम्ही जर महापालिका निवडणुकीत निवडून आलो, तर हा अधिकार तुम्हाला नक्कीच मिळवून देऊ,' असं ओवेसी यांनी म्हटलं. या सभेत भाजपा सरकारवरही ओवेसींनी टीका केली. शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून भाजपा राजकारण करतंय, असं ते म्हणाले.

Loading Comments