शिवसेनेची आढावा बैठक

 Dadar
शिवसेनेची आढावा बैठक

दादर - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर बंगल्यावर शिवसेनेची आढावा बैठक झाली. पाणी, रस्ते, दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांवर गेल्या वेळची महापालिका निवडणूक लढवण्यात आली होती. निवडणुकीत मतदारांसमोर जाताना विकासकामं घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यामुळे वचननाम्यातली कोणती कामं पूर्ण झालीत? किती विकासकामं आणि प्रकल्प पूर्ण झालेत याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या वेळी रखडलेली विकासकामं आणि प्रकल्प मार्गी लावा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तसंच महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, महापालिका आयुक्त अजॉय मेहता, सर्व अतिरिक्त आयुक्तही या बैठकीला उपस्थित होते.

Loading Comments