Advertisement

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत विधानभवनात एन्ट्री

मराठी भाषा विभागाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे आले होते.

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत विधानभवनात एन्ट्री
SHARES

विधानभवनात दिसलेल्या एका चित्रामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी विचारले. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. उद्धव यांनी म्हटले की, पूर्वी खुलेपणा होता. पण हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते असे म्हणतात. त्यामुळे जेव्हा कधीतरी, कदाचित आमची बंद दाराआड चर्चा झाली तर त्यावेळी बोलू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. विधानभवनात मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच वेळी आलो. त्यावेळी शिष्टाचारानुसार आम्ही नमस्कार, राम..राम, हॅलो.. केले.

आजच्या या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचा भाजपला होणारा विरोध मावळणार का, असा प्रश्न केला असता उद्धव यांनी त्याचा थेट इन्कार केला. कोणालाही नमस्कार, हाय-हॅलो हे एखाद्या हेतूनेच करावे का, असा उलटप्रश्नही त्यांनी केला.

आज विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवता एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळात गेले. त्यामुळे अनेक चर्चा उधाण आले आहे.


हेही वाचा

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमचा बेकायदेशीर दर्गा अखेर पाडला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा