शिवसेना म्हणते DidYouKnow?

मुंबई - करून दाखवलं...ही शिवसेनेची जुनी टॅग लाईन..या टॅगलाईनवरून शिवसेनेला अनेकदा विरोधकांच्या टीकेचं धनीही व्हावं लागलं होतं..मात्र आता शिवसेनेची ही टॅग लाईन बदललीय...ज्याचं रुपांतर झालंय़ DID YOU KNOW मध्ये...साहजिकच पालिका निवडणूक जवळ आल्यानं मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना ही टॅगलाईन घेऊन आलीय. आणि शिवसेनेन तसं कॅम्पेनही सुरू केलंय. मात्र शिवसेनेच्या या नव्या टॅग लाईनचाही विरोधकांनी समाचार घेतलाय. विरोधक कितीही टीका करोत, मुंबईचा विकास शिवसेनेने केलाय. आणि तेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं शिवसेना आमदार अनिल परब यांचा दावा आहे. 2012 च्या पालिका निवडणुकीत 'करून दाखवलं' ही शिवसेनेची टॅग लाईन मुंबईकरांच्या पंसतीस उतरली होती. आणि आता ही नवी टॅग लाईन..

Loading Comments