आम्हीही केलं मतदान, आणि तुम्ही?

Mumbai
आम्हीही केलं मतदान, आणि तुम्ही?
आम्हीही केलं मतदान, आणि तुम्ही?
आम्हीही केलं मतदान, आणि तुम्ही?
See all
मुंबई  -  

मुंबई - मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात गर्दी वाढतेय. फक्त सामान्यच नाही तर दृष्टीहीनही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेत. शिवाजी पार्कचे रहिवासी असलेले विजय कुमार पांडुरंग संझगिरी यांनीही मतदान केले. ते 82 वर्षांचे आहेत. त्यांना फक्त 5 टक्केच दृष्टी आहे. 18 वर्षांचे असल्यापासून ते आपल्या बहिणीसोबत मतदानाला येतात. त्यांची बहीण जोत्स्ना पांडुरंग संझगिरी या 72 वर्षांच्या आहेत. प्रभाग 191 मधल्या दादरच्या शिवाजी पार्क जवळील बालमोहन विद्यामंदिर या शाळेत त्यांनी मतदान केलं.

"उमेदवारांनी जनतेचा आणि दृष्टीहीन व्यक्तींचा विशेष विचार करावा. तसेच आम्हाला रोड क्रॉस करताना त्रास होतो त्याबाबत काही सोईसुविधा द्याव्यात," अशी मागणी विजयकुमार यांनी केली. तर "दृष्टीहीन मतदारांना त्रास होतो त्यामुळे इमारतीत वरच्या माळ्यावर बुथ ठेऊ नये," अशी मागणी विजयकुमार यांची बहीण जोत्स्ना यांनी केली.

तर मोतीलालनगर आणि घाटकोपर इथल्या पोलिंग बुथवर दिव्यांगांनीही मतदान केले. मतदानाच्या बाबतीत यांचा असलेला उत्साह हा खरच नवख्या मतदारांसाठी एक प्रेरणादायी आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.