Advertisement

आरारारारा...राजकारनाचा पार फ्याशन श्यो क्येला!


आरारारारा...राजकारनाचा पार फ्याशन श्यो क्येला!
SHARES

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरूवारी मुंबईतील एका कार्यक्रमात 'देशात कर्जमाफी ही नवी फॅशन आलीय', असे म्हणत शेतकऱ्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. नायडू यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतल्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी देखील 'नायडू फॅशन शो बघून आले असावेत' असे म्हणत त्यांच्यावर पलटवार केला आहे.

आपल्या देशात अलिकडच्या काळात कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, असे वक्तव्य नायडू यांनी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात झालेल्या एका कार्यक्रमात केले होते.


व्यंकय्या नायडू मुंबईत येण्याच्या आधी कुठे गेले होते माहीत नाही. पण ते कदाचित फॅशन शो बघून आले असावेत. दानवे 'साले' म्हणतात आणि नायडू 'कर्जमाफी मागणे ही शेतकऱ्यांची फॅशन झालीय', असे वक्तव्य करतात. त्यांचे हे विधान कर्जमाफीकडे केंद्र सरकार किती नकारात्मक भूमिकेकडून पाहते हेच दर्शवते.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री



हे देखील वाचा

‘जय महाराष्ट्र’ मुळे दिवाकर रावते पेचात



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा