Advertisement

रिअली रिपब्लिक?


SHARES

मुंबई - देशभरात गुरुवारी 68 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने मुंबईतील तरुणांना देशाबद्दल आणि विशेषत: प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती आहे का? हे पाहण्याचा 'मुंबई लाइव्ह'ने प्रयत्न केला. आम्ही मुंबईतील तरुण-तरुणींना देशाबद्दल आणि विशेषत: प्रजासत्ताक दिनाबद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी काहींनी अचूक उत्तरे दिली तर काही जण उत्तरे देताना गडबडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तरुणांना राष्ट्रगीत कुणी लिहिले? तिरंग्याचे रंग काय प्रतिक दर्शवतात? देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती कोण? तसेच लाल किल्ल्यावर कुणाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते? यासारखे एक ना अनेक प्रश्न मुंबईच्या तरुणांना विचारण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा