Advertisement

राज ठाकरेंची साथ सोडली ‘या’ नेत्यानं, व्हायरल होतोय शेवटचा मेसेज

पण हा मेसेज नक्की राजेश कदम यांनीच केला आहे का? याची खात्री नाही.

राज ठाकरेंची साथ सोडली ‘या’ नेत्यानं, व्हायरल होतोय शेवटचा मेसेज
SHARES

मनसेचे (MNS) डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. मनसेतून बाहेर पडलेले राजेश कदम हे पक्षाचे जुने नेते आहेत. त्यांनी विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे राजेश कदम यांच्यासारखा नेता पक्ष सोडून गेल्यानं डोंबिवलीतील कार्यकर्तेही गोंधळात पडले.

मात्र अशातच राजेश कदम यांच्या नावानं एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. 'मनसे मध्यवर्ती, डोंबिवली' या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर 'सर्वांना मनापासून धन्यवाद...मला माफ करा...तुमच्यावर नेहमीच प्रेम असेल, आपला राजेश कदम,' असा मेसेज राजेश कदम यांनी टाकल्याचं व्हायरल स्क्रीनशॉटमधून दिसत आहे. पण हा मेसेज नक्की  राजेश कदम यांनीच केला आहे का? याची खात्री नाही.

राजेश कदम यांच्या सोबतच इतरही मनसेच्या महत्वाच्या पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम यांच्यासह युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी शिवसेनेतून राज ठाकरे यांच्या मनसेत आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण दुर्लक्षित आहोत, असं म्हणत राजेश कदम आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.

मनसेतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये यांचा समावेश

१) राजेश शांताराम कदम, मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष, माजी परिवहन सभापती

२) सागर रवींद्र जेधे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष

३) दीपक शांताराम भोसले, डोंबिवली शहर संघटक,माजी परिवहन सदस्य

४) राहुल गणपुले, प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष

५) कौस्तुभ फकडे, मनविसे डोंबिवली शहर सचिव

६ ) सचिन कस्तुर, मनविसे शहर संघटक

७) स्वप्नील वाणी, मनसे शाखा अध्यक्ष

८) निखिल साळुंखे, मनसे उपशाखा अध्यक्ष

९) कुणाल मोर्ये, मनविसे शाखा अध्यक्ष

१०) महेश कदम

११) राजेश मुणगेकर, शहर संघटक

राजेश कदम आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांनी पक्षाची फसवणूक करत पाठीत खंजीर खुपसल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सोबतच राजेश कदम यांना पक्षाने सर्वकाही दिलं, आमदारकीची उमेदवारीही दिली, मात्र ते का गेले? हे अनाकलनीय असल्याचं राजू पाटील म्हणाले.



हेही वाचा

अर्थसंकल्पाने पुन्हा मरणाच्या वाटेवर नेऊन सोडलंय- अजित पवार

पेट्रोल-डिझेल हजार रुपयांवर न्यायचंय का? संजय राऊतांचा टोला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा