चैत्यभूमीवर सुरक्षिततेसाठी ड्रोनची नजर

दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून चैत्यभूमीवर प्रचंड गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येतोय. त्यासाठी महापालिका आयुक्त अजॉय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याची चाचणी केली. चैत्यभूमीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांना या ड्रोन कॅमेऱ्याची मदत होते आहे.

Loading Comments