'दुकानदारी'

  मुंबई  -  

  मुंबई - राजकारण म्हणजे दुकान आणि राजकारणी हा गल्ल्यावर बसणारा दुकानदार. ही एखाद्या संतप्त मतदाराची प्रतिक्रिया नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणा-या उमेदवाराने विषद केलेला हा भावार्थ आहे. वॉर्ड क्रमांक 221 मधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणा-या आकाश पुरोहित या उमेदवारानं ही मुक्ताफळं उधळली आहेत. आकाश पुरोहित हे आमदार आणि मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे चिरंजीव आहेत. थोडक्यात बेजबाबदार विधानं करण्याच्या बाबतीत आकाश यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे.

  आपल्याला नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवण्याची संधी मिळण्यामागे 'बाबा तुमचा आशीर्वाद' हेच आहे, हे वास्तव आकाश पुरोहित यांनी आपल्या मतदारांशी संवाद साधताना 'डंके की चोट' पर मान्य केलं आहे. आकाश यांनी राजकारणाच्या दुकानदारीत 'दुकानदार' म्हणून करियर करण्याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे राजकारण आणि घराणेशाही हा निवडणुकीच्या मोसमात चवीनं चघळला जाणारा विषय़ पुन्हा एकदा चर्चेसाठी खुला झाला आहे. यानिमित्तानं राजकारणातल्या घराणेशाहीचं समर्थन करणा-या नेतेमंडळींच्या वक्तव्यांचा 'मुंबई लाइव्ह'कडे असलेला हा रेकॉर्ड.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.