Advertisement

गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं 'अॅप'


गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं 'अॅप'
SHARES

मुंबई - 21 फेब्रुवारीला मुंबई महानगर पालिका निवडणूक संपन्न होणार आहे. यासाठी आता राज्य निवडणूक आयोगानेही पुढाकार घेतला आहे. नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन आयोगाकडून केले जात आहे. याचसोबत निवडणूक आयोगाकडून एक 'अॅप'ही लाँच करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून निवडणूक काळात होणारे गैरप्रकारावर थांबवण्यास मदत होणार आहे.

असा करा 'अॅप'चा वापर -

  1. गुगल प्ले स्टोअरवरून सीओपी अर्थात सिटीजन ऑन पेट्रोल हे अॅप डाऊनलोड करा. हे अॅप विनाशुल्क असून, याच्या डाऊनलोडसाठी कोणताही चार्ज लागणार नाही.

  2. 'अॅप' डाऊनलोड केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, इमेल आयडी आणि पासवर्ड विचारला जाईल. तसेच तुम्हांला या 'अॅप'साठी नवीन पासवर्ड बनवावा लागेल.

  3. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे लागेल. लॉगइन केल्यानंतर तुम्हाला बटनासारखे चिन्ह दाखवण्यात येईल. ते क्लिक केल्यानंतर ते सरळ कॅमेऱ्याला जोडले जाईल.

  4. त्यानंतर तुम्ही निवडणुकीसंबधीत घटनांचे फोटो घेऊ शकता आणि त्यानंतर सदर घटनेचा क्रम ठरवून त्याची वर्गवारी करता येईल.

  5. विशेष म्हणजे फोटो काढल्यानंतर तुम्हाला त्या घटनेची माहिती द्यावी लागेल.

  6. संपूर्ण माहिती तुम्ही नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर निवडणूक आयोगाकडे 'अॅप'द्वारे जाईल.

  7. यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेल तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडीवर येईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा