Advertisement

राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी होणार सादर


SHARES

मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे. शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात मांडला. "आता विकासदर 9.4 टक्के आहे आणि त्यापेक्षाही अधिक वाढेल," असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच "जगाचा सरासरी विकास दर 2.2 टक्के आहे. त्यामानाने राज्याचा विकास दर चांगला आहे. सर्वात जास्त रोजगार देणारा कृषी क्षेत्र आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. "नोटाबंदीमुळे भिती होती की महसूल कमी होईल. मात्र मागील वर्षीपेक्षा 11.04 टक्के जास्त महसूल झाला आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

अहवालात नमूद केलेले मुद्दे

  • राज्यावर 3 लाख 56 हजार 223 कोटींचे कर्ज
  • राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ
  • 2014-15 च्या तुलनेत 2015-16 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 1 लाख 47 हजार 399
  • एप्रिल ते डिसेंबर 2016 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली 1 लाख 40 हजार 864 कोटी, मागील वर्षांपेक्षा 11.4 अधिक वाढ
  • महसूल खर्चातही वाढ. मागील वर्षी महसूल खर्च 2 लाख 07 हजार 611 कोटी. तर या वेळी महसूल खर्च 2 लाख 24 हजार 455 कोटी अपेक्षित
  • 2016-17 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित
  • 2016-17 मध्ये राज्याची अपेक्षित वित्तीय तूट 35 हजार 031 कोटी
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा