Advertisement

भावना गवळी, अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

शिवसेनेच्या यवतमाळ खासदार भावना गवळी आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचलनालयाकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

भावना गवळी, अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे
SHARES

शिवसेनेच्या यवतमाळ खासदार भावना गवळी आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचलनालयाकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यासंदर्भात त्यांनी ईडीकडे तक्रार देखील दाखल केली होती. तर दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भात ईडीकडून अनिल देशमुख यांच्या प्रकरणात अनिल परब यांच्याही मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ईडीने भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम इथं असलेल्या ५ संस्थांवर धाडी टाकल्या. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रॉडक्ट सर्विस लिमिटेड या कंपन्यांवर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आले असून यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

तर, अनिल देशमुख मनी लाँडरिंग प्रकरणात अनिल परब यांच्या संबंधाने ईडीने तीन ठिकाणी धाडी टाकल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने दिली आहे. या धाडी नेमक्या कोणत्या ठिकाणी व कोणत्या मालमत्तांवर टाकण्यात आल्या, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा