म्हणून तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट!

एकीकडं राज नाणार, बुलेट ट्रेन, फेरीवाला अशा अनेक विषयांवर खळखट्याक करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना, मोदीमुक्त, भाजपमुक्त देशाचा नारा देत असताना आणि ईव्हीएम घोळावरून भाजपाच्या विजयावर साशंकता व्यक्त करत असताना भाजपाच्या एका नेत्यानं राज यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

SHARE

सोमवारी सकाळी भाजपाचे नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. तावडे आणि राज यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. पण ही चर्चा नेमकी कुठल्या विषयावर झाली याची माहिती मात्र समोर आलेली नाही.


तर्कवितर्कांना उत

लोकसभा-विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येताहेत तसतशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांच्या गाठीभेठी वाढू लागल्या आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गुपचूप-गुपचूप भेट झाली. त्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. त्यातच तावडे कृष्णकुंजवर जाऊन धडकल्याने तर्कवितर्कांना उत आला आहे.


विरोध असूनही भेट

एकीकडं राज नाणार, बुलेट ट्रेन, फेरीवाला अशा अनेक विषयांवर खळखट्याक करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना, मोदीमुक्त, भाजपमुक्त देशाचा नारा देत असताना आणि ईव्हीएम घोळावरून भाजपाच्या विजयावर साशंकता व्यक्त करत असताना भाजपाच्या एका नेत्यानं राज यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याआधीही भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतली होती.


ठाणे नाट्यसंमेलनाचं निमंत्रण?

तावडे आणि राज यांच्या भेटीचं आणि चर्चेच कारण कळलं नसलं तरी ही भेट ठाण्यामधील नाट्यसंमेलनाबाबत असल्याचीही चर्चा आहे. ठाण्यामध्ये नाट्यसंमेलन होत असून यासाठीचं निमंत्रण देण्यासाठी तावडे कृष्णकंजुवर गेल्याचं समजतं आहे.


शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी भेट घेतली. या भेटीत तावडे यांनी राज यांना ठाणे इथं होणाऱ्या नाट्यसंमेलनाला येण्याचं निमंत्रण दिलं. या व्यतीरिक्त या दोघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.
- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसेहेही वाचा-

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या- शरद पवार

कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - अशोक चव्हाणसंबंधित विषय
ताज्या बातम्या